साधकांनो, स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचा विचार न करता निष्काम भावाने साधना करा !

‘काही साधकांना ‘स्वतःची आध्यात्मिक प्रगती होत आहे कि नाही ?’, असा प्रश्न पडतो. साधकांनी प्रगतीचा विचार न करता आपली साधना चिकाटीने आणि तळमळीने करत रहायला हवी; कारण सर्वकाही ईश्वरेच्छेनेच घडत असते.

भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । (श्रीमद्भगवत्गीता अध्याय २, श्लोक ४७) म्हणजे तुला (साधकाला) कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्याच्या फळाविषयी अधिकार नाही.’ भगवंताच्या या वचनावर श्रद्धा ठेवून साधकांनी फळाची, म्हणजे आध्यात्मिक प्रगतीची अपेक्षा न करता निष्काम भावाने साधना करावी ! योग्य वेळी कर्माचे फळ सर्वांनाच मिळणार आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले