सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांकडूनच उल्लंघन !
ठाणे – सर्वोच्च न्यायालयाच्या २०१६ च्या निर्देशानुसार गुन्हा नोंद झाल्यानंतर प्रथम खबरी अहवालाची माहिती ‘सिटीजन पोर्ट’वर ७२ घंट्यांत अपलोड करणे बंधनकारक आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागही अशा सूचना वारंवार देते; मात्र तरीही ठाण्यासह राज्यातील सर्वच पोलिसांकडून केवळ ४० टक्केच गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध केली जाते. याविषयी अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांकडे विचारणा केली आहे.
संपादकीय भूमिका :गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असतांना पोलिसांनी अशी अपुरी माहिती देण्यामागील कारणांचा शोध घ्यायला हवा ! पोलीसच अशी लपवाछपवी करू लागले, तर राज्यात कायदा-सुव्यवस्था कोण राखणार ? |