नक्षलवादी समुहांशी संबंध असल्याचा आरोप असणारे जी.एन्. साईबाबा यांची कारागृहातून सुटका !

जी.एन्. साईबाबा

नागपूर – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने देहली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक जी.एन्. साईबाबा आणि इतर ५ जण यांची ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर निर्दोष मुक्तता केली होती. जी.एन्. साईबाबा आणि इतर ५ जण यांची निर्दोष मुक्तता करत त्यांची जन्मठेपेची शिक्षाही रहित करण्यात आली. त्यानंतर ७ मार्च या दिवशी सकाळी जी.एन्. साईबाबा यांची येथील कारागृहातून सुटका करण्यात आली.

१. नागपूर खंडपिठाने यूएपीएनुसार नक्षलवादी समुहांशी संबंध असल्याच्या आरोपातून जी.एन्. साईबाबा आणि इतर ५ जण यांच्या शिक्षेचा निर्णय रहित ठरवण्यात आला.

२. साईबाबा आणि त्यांचे सहकारी यांना वर्ष २०१४ मध्ये नक्षलवादी गट आणि भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटक झाली होती.

३. नागपूर खंडपिठाने साईबाबा यांना निर्दोष ठरवल्यानंतर सरकारी पक्षाकडे सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागेल. याविषयी सरकारी अधिवक्त्यांकडून शक्यतांवर चर्चा चालू आहे.

४. उच्च न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी धक्का मानला जात आहे.