काही दिवसांपूर्वी मी आयुर्वेदाच्या एका शिबिरासाठी गेले होते. या शिबिरामध्ये १०० हून अधिक मुली आणि महिला सहभागी झाल्या होत्या. सर्वजण वैद्या होत्या. येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे आलेल्यांपैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच महिलांनी केस बांधले होते. अन्यथा सर्व मुली आणि महिला यांनी एकतर केस पूर्ण मोकळे सोडले होते किंवा केसांच्या वरच्या भागात ‘क्लचर’ (थोडे केस बांधण्याची पिन) लावून खाली मोकळे सोडले होते. यामध्ये काहींचे केस पुष्कळ लांब होते, तर काहींचे केस आखूड होते; परंतु ते मोकळे सोडलेले होते. यातून एकच भाग प्रकर्षाने अधोरेखित होतो, तो म्हणजे पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे नवरूढीच्या नावाखाली आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. त्याचा परिणाम वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्यावर होत आहे, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. स्त्रियांनी केस कापून मोकळे सोडल्यामुळे त्याचा परिणाम त्या स्त्रीसह वातावरणावर कसा होतो, यामागील शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांनी केस कापल्यामुळे केसांच्या बोथट टोकांच्या हालचालींतून निर्माण होणारी त्रासदायक कंपनशक्ती वायूमंडलातील त्रासदायक स्पंदनांना आकृष्ट करून स्वतःत घनीभूत करते. कालांतराने त्या स्त्रीला अनिष्ट शक्तींच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. केस मोकळे सोडल्यामुळे केसांच्या हालचालीतील रजोगुणी नादस्पंदनांकडे वातावरणातील रज-तम कण, तसेच त्रासदायक लहरी आकृष्ट होतात, घनीभूत होतात आणि लगेचच बाह्य वायूमंडलात प्रक्षेपित होतात. मोकळ्या केसांच्या टोकांमधून नकारात्मक लहरी डोक्यापर्यंत सहज पोचतात. मोकळे केस सोडलेल्या जिवाभोवतीचे वायूमंडल अतिशय त्रासदायक असते. त्याचा परिणाम स्त्रीच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर होतो. अशा स्त्रीच्या सहवासातील लोकांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. तिचे मन आणि बुद्धी यांवरही नकारात्मक स्पंदनांचा परिणाम होतो. यामुळे तिची वृत्ती पालटू शकते. याचा परिणाम आचार-विचार, तसेच वागणे-बोलणे यांवर होतो. वरील सर्व परिणाम वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनातून सिद्ध झालेले आहेत. पूर्वीच्या काळी ‘केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नका’, असे सांगितले जात होते. कदाचित् त्यांना शास्त्र ठाऊकही नसेल; परंतु ही कृती अयोग्य आहे; म्हणून त्या तसे करत नसत. आता मात्र मुली किंवा महिला हे मानत नाहीत.
स्त्री ही ‘शक्ती’ आहे. स्त्रियांनी धर्माचरणाचे पालन केल्यास ही शक्ती स्वतःसह वातावरणामध्येही कार्यरत होईल. यासाठी स्त्रियांनी वेशभूषा, केशमूषा, स्वतःचे वागणे, चालणे, बोलणे हे भारतीय संस्कृतीला धरून करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते. सध्या स्त्री असुरक्षित असण्यामागे हेही एक कारण आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही !
– वैद्या ((कु.) सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.