श्रीरामपूर येथे ‘राष्ट्रीय श्रीराम संघा’च्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन मुलीची ‘लव्ह जिहाद’मधून सुटका !

एका धर्मांध मुसलमानावर गुन्हा नोंद !

श्रीरामपूर (जिल्हा अहिल्यानगर) – दीड महिन्यापूर्वी संगमनेर शहरातील एका अल्पवयीन मुलीला खोटे आमीष दाखवून आरोपी मुन्ना शेखने लव्ह जिहादच्या जाळ्यात फसवून तिला संगमनेर येथून श्रीरामपूर येथे पळवून आणले होते. पीडित मुलीच्या पालकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली. एक महिना होऊन गेला, तरी मुलीचा तपास लागत नसल्याने मुलीच्या पालकांनी श्रीरामपूर येथील ‘राष्ट्रीय श्रीराम संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदु धर्मरक्षक सागर बेग यांच्याशी संपर्क करत साहाय्याची मागणी केली.

बेग यांनी प्रकरणातील गांभीर्य ओळखून संगमनेर शहर पोलिसांशी संपर्क साधला. आरोपी मुन्ना शेख हा कुख्यात गुन्हेगार असून तो भ्रमणभाष वापरत नसल्याने आणि दुसर्‍या भ्रमणभाषवरून घरी बहिणीला ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून संपर्क करत असतो. त्यामुळे त्याचे ठिकाण शोधणे पोलिसांना शक्य होत नाही. तेव्हा राष्ट्रीय श्रीराम संघाने अवघ्या ८ दिवसांत आरोपी श्रीरामपूर शहरात असून त्याने १७ वर्षीय पीडितेला डांबून ठेवल्याची माहिती मिळवली. (जी माहिती एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेला मिळते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना कशी मिळत नाही ? – संपादक) त्यांनी पोलिसांना संपर्क करून ही माहिती दिली असता त्यानुसार संगमनेर पोलिसांनी श्रीरामपूर पोलिसांच्या साहाय्याने आरोपी मुन्ना शेख आणि पीडित मुलीला श्रीरामपूर वार्ड क्रमांक २ मधील एका घरातून कह्यात घेतले.

अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांच्या कह्यात देण्यात आले, तर आरोपी मुन्ना शेखवर संगमनेर पोलीस ठाणे येथे पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मुलीला शोधण्यात यश आले. शोध मोहिमेत संगमनेर आणि श्रीरामपूर शहरातील सर्व हिंदुरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीही विशेष परिश्रम घेतले.

संपादकीय भूमिका 

श्रीरामपूर शहरात लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधी कायदा करावा, असेच राज्यभरातील हिंदूंना वाटते !