मालदीवमध्ये परदेशी सैन्य तैनात नाहीत ! – अब्दुल्ला शाहीद, माजी परराष्ट्रमंत्री, मालदीव

मालदीवचे माजी परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांचा दावा !

डावीकडून अब्दुल्ला शाहीद आणि मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू

माले (मालदीव) – मालदीवमध्ये परदेशी सैन्य तैनात नाहीत, असे महत्त्वाचे विधान मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी केले आहे. यापूर्वी मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू यांनी येत्या १५ मार्चपर्यंत भारताने त्याच्या सैनिकांना मालदीव म्हणून हटवावे, असे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर शाहीद यांचे विधान मुईज्जू यांना उघडे पाडणारे आहे.

सौजन्य विऑन 

शाहीद यांनी ‘एक्स’वर पोस्ट करतांना म्हटले आहे की, १०० दिवसांनंतर हे स्पष्ट आहे, ‘सहस्रो भारतीय सैनिकांं’विषयीचे अध्यक्ष मुईज्जू यांचे दावे खोटे आहेत. सैन्याची संख्या देण्यास सरकार असमर्थ आहे. देशात कोणतेही सशस्त्र परदेशी सैनिक तैनात नाही. पारदर्शकता महत्त्वाची आहे आणि सत्याचा विजय झाला पाहिजे.’