हिंदू आणि पोलीस हल्द्वानी हिंसाचारातून धडा घेतील का ?

८ फेब्रुवारी या दिवशी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशाने हल्द्वानी (उत्तराखंड) येथील मलिका बगीच भागात बेकायदेशीर मदरसा पाडण्यास गेलेले प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्यावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी दगडफेक करून पेट्रोलबाँब फेकले, तसेच गोळीबार करून आक्रमण केले. येथील बनभूलपुरा पोलीस ठाण्यावरही आक्रमण करून पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली. पोलिसांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला पोलिसांना त्यांनी मारहाण केली. सरतेशेवटी अधिक कुमक मागवून स्वत:ची सुटका करून घेण्याची दुर्दैवी वेळ पोलिसांवर ओढावली. या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक पोलीस घायाळ झाले आहेत. हे आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे हल्द्वानीच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी सांगितले. ही घटना संपूर्ण देशाला सुन्न करणारी आहे. आधी अवैध बांधकामे करायची आणि नियमांनुसार ती पाडणार्‍यांचा जीव घेऊ पहायचा, हे भयंकर आहे. जणू काही देशात सुलतानी राजवट अस्तित्वात आहे, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? नियम, कायदे केवळ हिंदूंनी पाळायचे आणि अन्य धर्मियांनी मात्र ते वारंवार धुडकावून लावायचे, पायदळी तुडवायचे. त्यांच्या या अशा वर्तणुकीविषयी कुणीही चकार शब्द काढायचा नाही. गपगुमान बसायचे. भारतात हिंदु सोडून सर्वांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; पण हे असे झाले, तर त्याला विरोध करायला नको का ? वेळीच बेकादेशीर बांधकामांना आवर घातला नाही, तर एक दिवस सर्वत्र अशा बांधकामांचाच सुळसुळाट होईल अन् मग उद्या भारतालाही हे धर्मांध बेकायदेशीर ठरवण्यात मागे-पुढे पहाणार नाहीत. यामुळे विरोध आणि पाडकाम व्हायलाच हवे; मात्र ते करतांना स्वत:ची शिकार होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कायदा-सुव्यवस्था राखू पहाणार्‍यांचा जीव घ्यायचा, हे जणू काही आता समीकरणच झालेले आहे.

१. धर्मांधांकडून वारंवार हिंदूंवर आक्रमणे

उत्तराखंडमध्ये काही मासांपूर्वी हिंदूंनी कावड यात्रा काढली होती. यात्रेला अनुमती देण्यापूर्वी मुसलमानांनीच हिंदूंना पुष्कळ अटी घातल्या होत्या. कुठलेही शस्त्र किंवा काठ्या आणण्यास प्रतिबंध करण्यात आल्या. हिंदूंच्या यात्रेला अटी लावणारे मुसलमान कोण ? हिंदूबहुल देशात हिंदूंना मुसलमानांच्या ताटाखालचे मांजर व्हावे लागते, यापेक्षा लज्जास्पद काही नाही. खरे तर कुणाचीही आडकाठी न येता हिंदूंना मुक्तपणे यात्रा काढता यायला हवी. हे बहुधा हिंदु राष्ट्रातच शक्य होईल. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे अतीलांगूलचालन केल्याने ते अधिकच डोक्यावर बसत चालले आहेत. जणू काही हा देश त्यांचाच आहे, अशा आविर्भावात हे धर्मांध वर्तन करत आहेत. हिंदूंच्या कार्यक्रमांत मुसलमानांची ही ढवळाढवळ आता कदापि सहन करायची नाही.

मुसलमानांच्या सर्व अटी मान्य करून काढलेल्या कावड यात्रेत ५ सहस्र हिंदु सहभागी झाले होते. स्वतःचा दुटप्पीपणा न सोडला तर ते मुसलमान कसले ? यात्रेच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण केले आणि संपूर्ण यात्रा उद्ध्वस्त केली. कावड यात्रेला गालबोट लागलेच ! अशा प्रकारे अनेक ठिकाणी धर्मांध हे हिंदूंवर आक्रमण करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि हिंदू निमूटपणे हा मार सहन करतात.

२. प्रत्येक वेळी हिंदूच होरपळला जातो ! 

बहुतांश ठिकाणी होणारी हिंदूंवरील आक्रमणे पूर्वनियोजित असतात. मशिदी, मदरसे, दर्गे आणि धर्मांधांची घरे येथे मोठ्या प्रमाणात दगड, पेट्रोलबाँब, शस्त्रसाठा साठवला जातो. रेल्वेस्थानक, प्रमुख महामार्ग, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये यांसारख्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणावर मशिदी बांधल्या जातात. येथेही सर्व शस्त्रसाठा जमवला जातो आणि वेळ पाहून हिंदूंवर आक्रमण केले जाते; पण या आक्रमणांना सामोरे जाण्याची सिद्धता नसल्याने प्रत्येक वेळी हिंदू मार खातात. पोलीसही धर्मांध मुसलमानांवर अंकुश ठेवण्यात आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना अद्दल घडवण्यास अपयशी ठरतात; पण यात सर्वाधिक होरपळला जातो, तो हिंदु ! हिंदूंची हानी अधिक होते.

३. हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांना हिंदूंचा असंघटितपणाच कारणीभूत !

अल्पसंख्यांकांच्या नावाने विविध सुविधा मिळवायच्या आणि देशातील बहुसंख्य हिंदूंवर आक्रमणे अन् अत्याचार करून त्यांना जेरीस आणायचे, त्यांचे रहाणे अवघड करायचे, असे धर्माधांचे षड्यंत्र असते. प्रत्येक वेळी हिंदूच त्यात फसतात. आतापर्यंत देशभरात शेकडो आक्रमणे होऊनही हिंदूंची त्याला प्रतिकार करण्याची सिद्धता किंवा मानसिकता अद्याप निर्माण झालेली नाही. याला हिंदूंची पराभूत मानसिकता आणि असंघटितपणाच कारणीभूत आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’, ही हिंदूंची मानसिकता अल्पसंख्यांकांना उद्दाम होण्यास वाव देते. हे हिंदूंनीही लक्षात घ्यायला हवे.

४. पोलिसांची निष्क्रीयता ! 

हल्द्वानी हिंसाचारापूर्वीही अनेक ठिकाणी पोलिसांना धर्माधांचा मार सहन करावा लागला. वर्ष २०१२ मध्ये मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या दंगलीतही पोलिसांवर आक्रमण करण्यात आले होते. जेव्हा जेव्हा हिंदू अथवा त्यांची धार्मिक  स्थळे यांवर धर्माधांकडून आक्रमण करण्यात आले, तेव्हा तेव्हा त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी धर्माधांचा मार खाल्ला आहे. एवढे सर्व होऊनही अजूनही घडणारे हल्द्वानी हिंसाचारासारखे प्रकार पोलिसांची निष्क्रीयताच दर्शवतात. इतकी आक्रमणे होऊनही पोलीस त्यातून बोध घेत नाहीत किंवा आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध होत नाहीत.

‘धर्माधांच्या हातूनच आपल्याला मृत्यू येणार’, असे पोलीसही आता गृहित धरू लागले आहेत. हे भारताला लाजिरवाणे नव्हे का ? पोलीसच शेळपट भूमिका घेऊ लागले, तर देशाला कोण वाचवणार ? किती काळ लाठ्या खायच्या, दगड अंगावर झेलायचे किंवा बाँब आक्रमणात आपल्या शरिरावर आणखी किती काळ जखमा होऊ द्यायच्या, याला काही मर्यादा आहेत कि नाही ? पोलिसांमध्ये काही स्वाभिमान उरला आहे कि नाही ? पोलीस असोत किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा धाक नष्ट झाल्याचे लक्षात येऊनही तो पुन्हा निर्माण करण्याचा ते का प्रयत्न करत नाहीत ? हे असेच चालू राहिले, तर पोलीसदलही संपुष्टात येईल, मग प्रशासनाला तरी कोण विचारतो ? सर्वकाही धर्मांधांच्या हाती येईल. ही स्थिती यायला नको, यासाठी प्रत्येकाने सिद्धतेनिशी सजग आणि तत्पर राहिले पाहिजे.

५. हिंदूंनो, धर्मांधांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी सिद्ध व्हा !

देशभरात विविध सणांच्या वेळी शोभायात्रा, रथोत्सव, कावडयात्रा, जत्रोत्सव इत्यादींचे आयोजन हिंदूंकडून केले जाते; मात्र अशांकडे धर्मांध लक्ष ठेवूनच असतात. त्यामुळे आक्रमणांची शृंखला चालूच रहाते. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्री रामलल्लाच्या मूर्ती (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेच्या वेळीही धर्मांधांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. पनवेल, मीरारोड येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली होती. अशा आक्रमणांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, सतर्कता आणि संघटितपणा वाढवणे आवश्यक आहे. ते जसे हिंदूंवर आक्रमण करण्याची एकही संधी सोडत नाही, तशी हिंदूंनीही त्यांना खडसवण्याची किंवा वेळीच प्रत्युत्तर देण्याची संधी सोडायला नको. हिंदू बलवान कधी होणार ?

६. पोलीस प्रशासन सुसज्जता कधी दाखवणार ?

देशात विविध भागांत ‘लँड (भूमी) जिहाद’द्वारे धर्मांधांनी शासनाच्या अथवा हिंदूंच्या भूमी बळकावल्या आहेत. अवैध बांधकामे करून मुसलमानांची वस्ती वाढवणे आणि संख्या वाढली की, स्थानिक हिंदूंना त्रास देऊन त्यांना पळवून लावण्ो हे धर्मांधांचे षड्यंत्र आहे आणि त्यात ते यशस्वी होत आहेत. सध्या विविध ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार धर्मांधांची अवैध बांधकामे पाडण्याचे काम चालू झाले आहे; परंतु धर्मांधांच्या हिंदुद्वेषी मानसिकतेमुळे अवैध बांधकामे पाडणार्‍यांनाच धर्मांधांकडून मोठा धोका संभावतो. पराकोटीचा हिंदुद्वेष आणि आक्रमक मानसिकता यांमुळे हिंदूंच्या वस्त्यांमध्ये धुडगूस घालून त्यांना ठार मारण्यासही धर्मांध मागे-पुढे पहात नाहीत. हल्द्वानी हिंसाचाराच्या घटनेवरून याची पुनर्प्रचीती येते.

ज्ञानवापी, काशी, मथुरा येथील मंदिरांप्रमाणे अनेक ठिकाणी धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करून तेथे मशिदी बांधल्या आहेत. सध्या यातील काही मंदिरांविषयीचा लढा चालू असून त्यात हिंदूंना यशही येत आहे; पण ते पाहून धर्मांध चवताळले आहेत. त्यांचा प्रतिकार करण्याची सिद्धता पोलीस, प्रशासन, सरकार किंवा हिंदू यांची आहे का ? हल्द्वानी हिंसाचाराच्या घटनेतून बोध घेऊन आता तरी पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई करतांना पूर्वसिद्धता करणे आणि सतर्कता बाळगून सुसज्ज रहाणे अन् हिंदूंचे रक्षण करणे आवश्यक आहे.

७. धूर्त व्हा आणि विविध नीतींचा अवलंब करा !

अनेक राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या शौयजागृतीची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या भारतात हिंदूंनी असे नेभळट न रहाता स्वधर्माभिमान जोपासत धर्मांधांना वठणीवर आणायला हवे. वेळप्रसंगी धर्मांधांना सामोरे जाण्यासाठी हिंदूंनीही धर्मावरील आघातांविरोधात आवाज उठवणे आणि आक्रमणांचा प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षण घेणे आवश्यक आहे. धर्मांधांना कूटनीतीद्वारे योग्य प्रत्युत्तर दिले, तरच त्यांच्यावर वचक बसेल. कोणतीही जटील समस्या सोडवणारा श्रीकृष्ण पांडवांकडे होता; म्हणूनच ‘कृष्णनीती’ अस्तित्वात आली. ती वापरूनच बलाढ्य कौरवांचा पराभव झाला. छत्रपती शिवाजी महाराज लाभले; म्हणून ‘गनिमी कावा’ आपल्याला समजला. परिपूर्ण नेतृत्वासह योग्य डावपेच आखणे, रणनीती अभ्यासणे, हे सर्व पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता आहे. पोलीस आणि सरकार यांनी याचा विचार करायला हवा. तसे झाल्यासच हिंदूंना सुरक्षित जीवन जगता येईल. (१७.२.२०२४)

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

हिंदूंनी धर्मांधांची नीती अभ्यासून परिपूर्ण नेतृत्व, योग्य डावपेच आखणे आणि प्रभावी संघटन करणे अशा कृष्णनीतीद्वारे त्यांच्यावर वचक बसवायला हवा !