अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !
अकोला – जिल्ह्यातील पातूर येथील इयत्ता १२ वीच्या परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी पुरवण्यास गेलेल्या तोतया पोलिसाला २२ फेब्रुवारी या दिवशी अटक करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर अभिवादन करतांना गडबड झाल्यामुळे तोतया पोलिसाचे खरे रूप उघड झाले आहे. खर्या पोलिसांनी अनुपम खंडारे (वय २४ वर्षे) या तोतया पोलिसांना अटक केली. तो पातूर येथील शाहबाबू उर्दू हायस्कूल येथे बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी पोलिसांच्या गणवेशात गेला होता. त्याचा गणवेश आणि त्यावरील नावाची पाटीही चुकीची होती.