|
मीरा-भाईंदर (मुंबई) – तेलंगाणा येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचा २५ फेब्रुवारीला येथे होणारा हिंदु जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी अनुमती न दिल्याने रहित करण्यात आला आहे. राजा सिंह यांच्या जुन्या विधानांचा संदर्भ देत, तसेच कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता वर्तवत पोलिसांनी मोर्चाच्या अनुमतीस नकार दिला आहे.
A 'Hindu Jan Aakrosh Morcha' organized at Mira-Bhayander.
Police deny permission to BJP MLA @TigerRajaSingh 's Hindu awakening rally.
👉 Police obstructing a peaceful Hindu awakening rally in a Hindu-majority Maharashtra, is nothing but pure Hindu hatred. pic.twitter.com/iNiVO4V32T
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 22, 2024
‘सध्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा चालू आहेत, तसेच मोर्चाला पुष्कळ गर्दी झाल्यास तिच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल’, अशी कारणेही पोलिसांनी या वेळी दिली आहेत. मोर्चाच्या आयोजकांना पोलिसांनी कलम १४९ नुसार बेकायदेशीररित्या एकत्र न येणे आणि पोलिसांच्या आदेशाचे पालन करणे यासाठी नोटीस बजावली आहे. (अन्य धर्मीय अकारण मोठ्या संख्येने एकत्र येऊन हिंसाचार माजवतात, त्यांना अशा प्रकारे नोटीस देण्याचे पोलिसांचे कधीच धाडस होत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदु जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी अनुमती नाकारणे हा निव्वळ हिंदुद्वेषच होय ! |