प्रमोद काळूवाला यांच्याकडून ‘सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्ट’साठी १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य !

डावीकडून प्रमोद काळूवाला हे सुरेश चव्हाणके यांना धनादेश देतांना

मुंबई, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – माहीम येथील प्रमोद काळूवाला या राष्ट्र आणि धर्म प्रेमीने ‘सुदर्शन राष्ट्रनिर्माण ट्रस्ट’साठी १० सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. हिंदु असल्याचा अभिमान असल्याने धर्मकार्यासाठी साहाय्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिक असूनही धर्मकार्यासाठी श्री. काळूवाला यांच्या आर्थिक योगदानाविषयी ‘सुदर्शन’ वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके यांनी त्यांचे कौतुक केले.

काळूवाला हे समुद्र किनार्‍याच्या भागात रहातात. देश आणि धर्म वाचवण्यासाठी देशाच्या सीमांचे रक्षण महत्त्वाचे आहे. या कार्यात कोळीबांधव तत्पर असल्याचे सांगून सुरेश चव्हाणके यांनी याविषयी कौतुक केले. ‘प्रमोद काळूवाला यांच्यासारखे हिंदुत्वनिष्ठच हिंदु राष्ट्रासाठीच्या संघर्षाचे खरे शिलेदार आहेत’, असे चव्हाणके म्हणाले.