प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी व्हिडिओ प्रसारित करून कावेबाज धर्मांधांचे स्वरूप केले उघड !
नवी देहली – संयुक्त राष्ट्रे यांसारख्या पाश्चात्त्य संस्था जिहादी आतंकवाद्यांची बाजू २ कारणांमुळे घेतात. ‘तकिया’ हे त्यातील पहिले कारण असून यानुसार जेव्हा मुसलमानांचा जीव धोक्यात असेल, तेव्हा त्यांच्या मनातील मूळ संकल्पना, विचार अथवा इच्छा त्यांनी बोलून दाखवू नयेत, असा त्याचा अर्थ आहे. कुराणमध्ये ‘तकिया’ या संकल्पनेचा उल्लेख असून यानुसार कृती करणे पाप नाही. त्यामुळे अल्पसंख्य असतांना मुसलमान ‘मुसलमानेतर आमचे शत्रू आहेत’, हे कदापि बोलून दाखवत नाहीत, असे वक्तव्य फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांनी केले. त्यांनी यासंदर्भात यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. याविषयीची माहिती त्यांनी ‘सनातन प्रभात’ला नुकतीच कळवली.
सौजन्य : Francois Gautier
१. या व्हिडिओमध्ये गोतिए पुढे म्हणतात की, दुसरे कारण असे आहे की, पाश्चात्त्य लोकांसमवेत जिहादी मुसलमान अत्यंत आदराने वागतात. त्यांचे आदरातिथ्य करतात. हा प्रयत्न हिंदूंच्या संदर्भात होत नाही. जिहाद्यांच्या या कृतींमुळे पाश्चात्त्य संस्था त्यांची बाजू घेतात. एक फ्रेंच पत्रकार म्हणून मी नव्वदच्या दशकात काश्मिरात असतांना मलाही याचा चांगला अनुभव आला आहे.
२. गोतिए यांनी या दोनही संकल्पना सांगण्यामागील पार्श्वभूमीवर सांगितली. ते म्हणाले की, हमासचे आतंकवादी इस्रायली लोकांचा अनन्वित छळ करत असतांनाही प्रारंभी संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्चात्त्य संस्था हमासची बाजू या कारणांमुळेच घेत होत्या.