५ टप्प्यांमध्ये ‘थीम पार्क’ उभारले जाणार; ४ कोटी रुपयांचा व्यय !
(ऑक्सिजन थीम पार्क म्हणजे लोकांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळावा, स्वास्थ्य चांगले रहावे, प्रदूषण अल्प व्हावे या दृष्टीने उभारलेली रचना)
पुणे – खडकवासला धरणासमोरील पाटबंधारे विभागाच्या ११ एकर जागेमध्ये ‘ऑक्सिजन थीम पार्क’चे भूमीपूजन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या ‘पर्यटन विकास योजने’तंर्गत हे काम होणार आहे. न्यू कोपरे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर आणि शिवणे येथील नागरिकांसाठी ५ टप्प्यांमध्ये होत असलेल्या या ‘ऑक्सिजन थीम पार्क’साठी ३ कोटी ८० लाख रुपयांचा व्यय होणार आहे. या कार्यक्रमास आमदार भीमराव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.