अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे रोजगारनिर्मितीमध्ये क्रांती !

‘अयोध्येतील श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर तेथे प्रचंड प्रमाणात पर्यटकांनी येण्यास प्रारंभ केला आहे. तेथे लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. त्यामुळे या भागात प्रचंड रोजगाराची निर्मिती होत आहे. असे म्हटले जाते की, रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात ही एक क्रांती आहे. वर्ष २०२३ मध्ये वाराणसी येथे ८ कोटींहून अधिक, प्रयागराज येथे ६ कोटी, काशी सुसज्ज मार्ग येथे ३ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. याचा अर्थ मागील वर्षी उत्तरप्रदेशमध्ये १७ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. आता असे म्हटले जाते की, अयोध्या हे भारतातच नाही, तर जगातील पर्यटनाचे एक सर्वाेत्कृष्ट स्थान होणार आहे. त्यामुळे भारतातीलच नाही, तर जगातील विक्रम मोडले जाणार आहेत.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

एवढी जलद रोजगाराची निर्मिती यापूर्वी कधीही झाली नव्हती. विमानतळे, रेल्वेस्थानक, रस्ते, विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा यांमुळे लोकांना तेथे पोचणे अत्यंत सोपे झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे आता उत्तरप्रदेशातील युवकांना पुणे-मुंबई येथे रोजगारासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. हे सर्व युवक अयोध्या, वाराणसी, प्रयागराज येथे जाऊन रोजगार मिळवतील. त्यामुळे ही मोठी क्रांती आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक जाऊ इच्छितात. त्यामुळे त्यांना भारताचा इतिहास कळेल.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.