परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सौ. सुप्रिया आठवले यांची माहेर आणि सासर ही दोन्ही कुटुंबे धार्मिक वृत्तीची असल्याचे उद्गार काढणे‘एकदा आमच्याकडे माझी सून सौ. सुमुखी सुयोग आठवले हिच्या मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन होते. त्या कार्यक्रमानिमित्त माझे (सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले) भाऊ, भावजय, दोन बहिणी, तसेच माझे यजमान श्री. सुरेंद्र आठवले यांचे भाऊ, भावजय, पुतण्या आणि दोन बहिणी इत्यादी नातेवाईक आले होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी, ‘‘दोन्ही कुटुंबे धार्मिक वृत्तीची आहेत’’, असे म्हणून सर्वांचे कौतुक केले होते.’ – सौ. सुप्रिया आठवले, फोंडा, गोवा. |
श्री. सुरेंद्र जगन्नाथ आठवले आणि सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले यांना त्यांच्या नातेवाइकांची (भाऊ आणि बहिणी यांची) जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. नित्यनाथ जगन्नाथ आठवले (श्री. सुरेंद्र आठवले यांचा मोठा भाऊ [वय ६६ वर्षे]), पेण, जिल्हा रायगड
१ अ. गायन शिक्षक म्हणून एका खासगी विद्यालयात २८ वर्षे नोकरी करणे : ‘माझ्या मोठ्या भावाने पेण येथील खासगी विद्यालयामध्ये २८ वर्षे गायन शिक्षक म्हणून नोकरी केली. आम्ही त्यांना ‘दादा’ म्हणतो. त्यांना लहानपणापासून गायनाची आवड होती. ते मुंबई येथील एका गायकाकडे गायन शिकायला जायचे. त्या गायकांनी माझ्या भावाला जुनी संवादिनी (हार्माेनियम) दिली होती. ती ते जपून वापरायचे. आम्हा लहान भावडांना हात लावू देत नसत.
१ आ. गाण्याच्या पदव्या प्राप्त केलेल्या असणे : ठाणे येथे एके ठिकाणी प्रत्येक रविवारी सकाळी दादा गायन शिकण्यासाठी जात असत. पुढील ज्ञान शिकण्याच्या दृष्टीने ते शिकत असत, तसेच त्यांनी गायकीच्या काही पदव्याही प्राप्त केल्या आहेत.
१ इ. पंचक्रोशीत कुठेही गाणे किंवा कीर्तन यांचे कार्यक्रम असल्यास दादांना बोलावणे येणे : पंचक्रोशीत कुणीही कीर्तनकार किंवा गायक आल्यास, प्रथम ते दादांना संवादिनी वाजवण्यासाठी बोलवत असत. दादा उपलब्ध नसल्यास ते त्यांना सांगत, ‘‘तुम्ही आज संवादिनी वाजवायला नव्हता. तुम्ही हवे होता. दुसर्याने संवादिनी वाजवतांना मला त्याला सांभाळून घ्यावे लागले.’’
२. सौ. अमिता अरुण जोग (श्री. सुरेंद्र आठवले यांची बहीण [वय ६० वर्षे]), श्रीवर्धन, जिल्हा रायगड
२ अ. घराचे दायित्व उत्तमरित्या पार पाडून सासरच्या लोकांची मने जिंकणे : घरची परिस्थिती बेताची असल्याने सौ. अमिता यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. अशा वेळी त्यांनी खचून न जाता वेगवेगळे पदार्थ बनवणे, शिवणकाम इत्यादी कला अवगत केल्या. या गोष्टींचा त्यांना विवाहानंतर पुष्कळ लाभ झाला. विवाह झाल्यावर घरातील सर्व दायित्व त्यांच्यावर आले. उत्तम स्वयंपाक आणि घरची कामे नीटनेटकी करून त्यांनी घरातील वडीलधार्या मंडळींची, उदा. आजेसासू, सासू-सासरे यांची मने जिंकली. घरी शिलाई यंत्र असल्याने त्या घरातील सर्व स्त्रियांचे कपडे शिवत असत. त्यांच्या मुली पुण्यात शिकत असतांना त्या स्वतः त्यांचे पोषाख शिवत असत. घरातील मोठ्यांचा आदर करावा, हा त्यांच्या अंगी रुजलेला संस्कार होता.
२ आ. ‘माझ्या नणंदेचा मला पुष्कळ आदर वाटतो.’ – सौ. सुप्रिया आठवले, फोंडा, गोवा. (सौ. अमिता जोग या सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले यांच्या नणंद आहेत.)
३. सौ. प्राजक्ता प्रमोद जोशी, (श्री. सुरेंद्र आठवले यांची लहान बहीण [वय ५३ वर्षे]), आपटा, रसायनी, जिल्हा रायगड
३ अ. सौ. प्राजक्ता आणि त्यांच्या कुटुंबियांची श्रीरामावर श्रद्धा आहे.
३ आ. उत्तम गृहिणी असून लहान व्यवसाय करणे : सौ. प्राजक्ता यांनाही परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्यासुद्धा उत्तम गृहिणी आहेत. त्यांनी आईकडून ‘उत्तम लोणचे कसे बनवायचे ?’, हे शिकून घेतले. आता त्या व्यवसाय म्हणून लोणचे आणि गोडा मसाला इतरांना बनवून देतात.
३ इ. सर्व कीर्तनकारांनी ‘आदरातिथ्य पुष्कळ चांगले झाले’, अशा शब्दांत कौतुक करून आशीर्वाद देणे : त्यांच्या गावात रामाचे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरात ९ दिवस उत्सव असतो. उत्सवासाठी लागणारे लोणचे त्या स्वतः करतात आणि अर्पण म्हणून देतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात आलेले कीर्तनकार आणि त्यांचे सहकारी यांच्यासाठी त्या स्वतः जेवण करून वाढतात. येणार्या सर्व कीर्तनकारांचे त्या चांगले आदरातिथ्य करतात. त्यांच्या घरून जातांना ‘आदरातिथ्य पुष्कळ चांगले झाले’, असे म्हणून सर्वजण भरभरून आशीर्वाद देतात.
– श्री. सुरेंद्र जगन्नाथ आठवले (वय ६३ वर्षे), फोंडा, गोवा. (४.४.२०२३)
४. श्रीमती सुनीता सांगवीकर (सौ. सुप्रिया आठवले यांची मोठी बहीण [वय ६५ वर्षे]), संभाजीनगर
४ अ. लहानपणापासून धार्मिक वृत्ती असणे : सुनीता लहानपणापासून धार्मिक वृत्तीची आहे. तिच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; पण तिला त्या प्रसंगांना केवळ विठ्ठलाच्या कृपेने आणि श्री गोंदवलेकर महाराजांच्या उपासनेने तोंड देणे शक्य झाले. ती नियमित नामजप करते.
५. श्रीमती शारदा विलास दाणी (सौ. सुप्रिया आठवले यांची मधली बहीण [वय ६३ वर्षे]), पुणे
५ अ. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचे दायित्व घेणे : लहानपणीच शारदाला आमच्या कुटुंबाचे दायित्व घ्यावे लागले; कारण आम्ही सर्वजण लहान असतांना आमच्या वडिलांचे निधन झाले. या बहिणीने स्वतःचे शिक्षण मध्येच सोडून अल्प कालावधीचा व्यावसायिक अभ्यासक्रम (कोर्स) केला आणि शाळेत नोकरी करण्यास आरंभ केला. दोन भावांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
६. श्री. प्रसाद वसंत मेढेकर (सौ. सुप्रिया आठवले यांचा लहान भाऊ [वय ५३ वर्षे]), पुणे
६ अ. वडिलांसमवेत पूजाविधी शिकून घेणे आणि वडिलांच्या निधनानंतर लहान वयातच मंदिरातील पूजा मनोभावे करून ते दायित्व सांभाळणे : प्रसाद वयाच्या १२ व्या वर्षापासून आमच्या वडिलांसमवेत (कै. वसंत शंकर मेढेकर) श्री सत्यनारायण आणि वास्तूशांती या पूजा, तसेच अन्य विधींसाठी जात असे. तो ५ व्या इयत्तेत असतांना अकस्मात् आमच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तो मंदिरातील पूजा करू लागला. (आमचे वडील पाचगणी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत होते.) त्याने देवतांची पूजा मनोभावे केली. लहान वयात त्याने हे दायित्व अगदी सचोटीने पार पाडले.
६ आ. आजारी आईचेही दायित्व घेणे आणि तिची अधिक मासात जावयांना वाण देण्याची इच्छा आजपर्यंत यथोचित पार पाडणे : त्याने पुण्यात त्याचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्याला आजारी आईचेही दायित्व घ्यावे लागले. आईच्या शेवटच्या काळात अधिक मास चालू होता. तिने भावाला सांगून जावयांसाठी वाणाचे साहित्य मागवले. ते ती जावयांना देऊ शकली नाही; कारण तत्पूर्वीच तिचे निधन झाले. ती आठवण लक्षात ठेवून माझा भाऊ लहान असूनही तो आम्ही चौघी बहिणी आणि आमचे यजमान यांना अधिक मासाचे वाण आजपर्यंत यथोचित देत आला आहे. ‘लहान भावामध्ये माणसे जोडायची कला वडिलांकडून आली’, असे मला वाटते. कुणाच्याही पडत्या काळात तो मनापासून सर्वांना साहाय्य करतो.
भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
७. श्रीमती शारदा विलास दाणी (सौ. सुप्रिया आठवले यांची मधली बहीण [वय ६३ वर्षे]), पुणे
७ अ. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाचे दायित्व घेणे : लहानपणीच शारदाला आमच्या कुटुंबाचे दायित्व घ्यावे लागले; कारण आम्ही सर्वजण लहान असतांना आमच्या वडिलांचे निधन झाले. या बहिणीने स्वतःचे शिक्षण मध्येच सोडून अल्प कालावधीचा व्यावसायिक अभ्यासक्रम (कोर्स) केला आणि शाळेत नोकरी करण्यास आरंभ केला. दोन भावांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
८. श्री. प्रसाद वसंत मेढेकर (सौ. सुप्रिया आठवले यांचा लहान भाऊ [वय ५३ वर्षे]), पुणे
८ अ. वडिलांसमवेत पूजाविधी शिकून घेणे आणि वडिलांच्या निधनानंतर लहान वयातच मंदिरातील पूजा मनोभावे करून ते दायित्व सांभाळणे : प्रसाद वयाच्या १२ व्या वर्षापासून आमच्या वडिलांसमवेत (कै. वसंत शंकर मेढेकर) श्री सत्यनारायण आणि वास्तूशांती या पूजा, तसेच अन्य विधींसाठी जात असे. तो ५ व्या इयत्तेत असतांना अकस्मात् आमच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तो मंदिरातील पूजा करू लागला. (आमचे वडील पांचगणीला विठ्ठल मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करत होते.) त्याने देवतांची पूजा मनोभावे केली. लहान वयात त्याने हे दायित्व अगदी सचोटीने पार पाडले.
८ आ. आजारी आईचेही दायित्व घेणे आणि तिची अधिक मासात जावयांना वाण देण्याची इच्छा आजपर्यंत यथोचित पार पाडणे : त्याने पुण्यात त्याचे शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्याला आजारी आईचेही दायित्व घ्यावे लागले. आईच्या शेवटच्या काळात अधिक मास चालू होता. तिने भावाला सांगून जावयांसाठी वाणाचे साहित्य आणून घेतले. ते ती जावयांना देऊ शकली नाही; कारण तत्पूर्वीच तिचे निधन झाले. ती आठवण लक्षात ठेवून माझा भाऊ लहान असूनही तो आम्हा चौघी बहिणी आणि आमचे यजमान यांना अधिक मासाचे वाण आजपर्यंत यथोचित देत आला आहे. ‘लहान भावामध्ये माणसे जोडायची कला वडिलांकडून आली’, असे मला वाटते. कोणाच्याही पडत्या काळात तो मनापासून सर्वांना साहाय्य करतो.
८ इ. प्रसाद प.पू. गोंदवलेकर महाराज यांचा भक्त असून ‘पौणिमेला नियमित येऊन सेवा करणारा भक्त अन् साधक’ म्हणून त्याचा सत्कार होणे : ‘विठ्ठल-रुक्मिणीची केलेली सेवा आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने नोकरी-व्यवसाय करतांना त्याला कुणी फसवले नाही कि वाईट संगतही लागली नाही’, ही गुरुकृपाच म्हणावी लागेल. गेल्या १५ वर्षांपासून प्रसाद प.पू. गोंदवलेकर महाराज यांची भक्ती, नामस्मरण आणि अन्नदान करतो. तो प्रत्येक पौर्णिमेला गोंदवले येथे जाऊन पहाटे २ ते ५ वाजेपर्यंत स्वयंपाकघरात सेवा करतो. तो सेवेला जातांना एकटा न जाता समवेत काही भक्तांना स्वतः घेऊन जातो. काही वर्षांपूर्वी गोंदवल्याचा शताब्दी सोहळा झाला. त्या वेळी ‘पौर्णिमेला नियमित येऊन सेवा करणारा भक्त अन् साधक’ म्हणून त्याचा सत्कार झाला होता.
९. सौ. मनीषा प्रसाद मेढेकर (सौ. सुप्रिया आठवले यांची भावजय [वय ४७ वर्षे]), पुणे
९ अ. प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेने जीवनात पुष्कळ पालट घडून आल्याने महाराजांवर विश्वास अन् श्रद्धा दृढ होणे : प्रसादचे लग्न होऊन मनीषा आमच्या घरात आली. तिने अगदी आनंदाने आणि सहजतेने आमची सर्व परिस्थिती स्वीकारली. आरंभी प्रसादची नोकरी थोडी बेताचीच होती. त्यातही ती पुष्कळ समाधानी होती. प.पू. गोंदवलेकर महाराज यांच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न झाले. त्यानंतर त्यांच्या जीवनात पुष्कळ पालट घडून आले आणि महाराजांवर तिचा विश्वास अन् श्रद्धा दृढ झाली.
९ आ. घरी धार्मिक कार्यक्रम करून येणार्यांना ‘प.पू. गोंदवले महाराज यांचा प्रसाद’ म्हणून अन्नदान करणे : मनीषा ज्याप्रमाणे तिच्या माहेरच्या सर्वांचे आदरातिथ्य करते, अगदी तितक्याच प्रेमाने ती सासरच्या मंडळींचेही आदरातिथ्य करते. ‘सध्याच्या परिस्थितीत त्यांना प.पू गोंदवलेकर महाराज यांनी भरभरून दिले आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे. ती वर्षभराचे सण अगदी मनापासून करते. नवरात्रीत कुमारीका पूजन आणि कुंकूमार्चन असे धार्मिक कार्यक्रम स्वतःच्या घरी करून येणार्याला ‘महाराजांचा प्रसाद’ म्हणून अन्नदान करते.’
भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सुप्रिया सुरेंद्र आठवले (वय ६१ वर्षे), फोंडा, गोवा. (४.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |