मुंबई – मुंबईत मराठी माणसाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मराठी माणसाचा येथील व्यवसाय, राजकारण, अर्थकारण यांतही टक्का घटत आहे. मराठी शाळा बंद होत आहेत. मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांतून मराठी माणूस हद्दपार होत आहे. परप्रांतियांचा टक्का मात्र वाढत आहे. येथील मूळ मराठी माणसासाठी ही चिंतेची गोष्ट आहे, याची जागृती व्हावी; म्हणून ‘मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती’ने हस्ताक्षर मोहीम राबवली. या वेळी मोहिमेत सहभागी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जागृती केली. या वेळी रस्त्याने येणारे जाणारे थांबून विषय समजून घेत होते. काही जण स्वयंस्फूर्तीने यात सहभाग घेत होते.
संपादकीय भूमिकामराठी भाषेला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणार्यांची नोंद सरकारने घेऊन मराठीचे संवर्धन करावे ! |