कल्याण येथे क्षुल्लक कारणावरून वाद घालत धर्मांधांकडून हिंदूवर आक्रमण !

ठाणे, ७ फेब्रुवारी (वार्ता.) – कल्याण येथे दुचाकी उभी करण्यावरून वाद घालत १० ते १५ धर्मांधांनी हिंदु औषध विक्रेत्यावर आक्रमण केले. यात दोघे घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. १० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

‘ये हिंदु है, इनको मारो, इनको छोडो मत ।’, ‘ये योगीराज नहीं है तुम्हारा, और ये अयोध्या नहीं है ।’, असे धर्मांध या वेळी म्हणत होते. या वेळी धर्मांधांनी हिंदु औषध विक्रेत्याचे कपडे फाडले. लोखंडी सळीने त्यांच्या डोक्यावर प्रहार करत लाथाबुक्क्यांनी मारले. जमीर कादिर शेख उपाख्य जमील काझी (वय ३४ वर्षे), महंमद सलीम इब्राहीम खान (वय ५४ वर्षे), शाहरूख जाफर शेख (वय ३१ वर्षे), फुरकान अख्तर पठाण, (वय २४ वर्षे), रौफ मेहमुद शेख (वय ४३ वर्षे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका 

धर्मांधांची वारंवार होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !