शासकीय मेल ‘व्हॉट्सॲप’द्वारे डाऊनलोड करण्यावर राज्यशासनाकडून प्रतिबंध !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – शासकीय मेल ‘व्हॉट्सॲप’ किंवा अन्य खासगी ॲपद्वारे डाऊनलोड करण्यावर राज्यशासनाकडून प्रतिबंध करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी या दिवशी शासन आदेश काढून याविषयीची सूचना सर्व शासकीय विभागांना देण्यात आली आहे. कामकाजातील गोपनीयतेसाठी राज्यशासनाने ही उपाययोजना काढली आहे.

शासकीय कामकाजात गोपनीयता रहावी, यासाठी कामकाजाची माहिती पाठवतांना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मेलद्वारेच माहिती पाठवणे सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे. याविषयी राज्य सरकारद्वारे यापूर्वी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आली आहे; मात्र सूचना देऊनही काही विभागांमध्ये राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मेलचा उपयोग होत नसल्यामुळे राज्यशासनाकडून याविषयी शासन आदेश काढण्यात आला आहे. मेल हॅक करणे किंवा सायबर आक्रमण हे धोके टाळण्यासाठी सरकारकडून ही उपाययोजना काढण्यात आली आहे.