साकीनाका (मुंबई) येथील प्रकार !

तरुणीच्या चित्रीकरणाचे ‘मेमरी कार्ड’ आणि ‘व्हॉट्सॲप’ संभाषणाच्या प्रती रहिवाशांना दिल्या !
मुंबई – २२ वर्षीय प्रेयसी तरुणीचे आक्षेपार्ह स्थितीत चित्रीकरण करून तिच्यावर अनेकदा बलात्कार करणार्या आरोपीविरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तरुणीने आरोपीच्या मागण्यांना नकार दिल्यानंतर आरोपीने चित्रीकरण असलेले ‘मेमरी कार्ड’ आणि ‘व्हॉट्सॲप’ संभाषणाच्या प्रती पीडित तरुणीच्या इमारतीमधील प्रत्येक घरासमोर ठेवल्या होत्या. (स्त्रीत्वाचा उघडपणे अवमान करणार्यांना कारावासातच डांबायला हवे ! – संपादक) गुरवैया बुसिरासी (वय ४१ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. त्या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते.
वरील प्रकारामुळे मानसिक दडपणाखाली गेलेली तरुणी घाबरली होती. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार केली नाही; पण आरोपी तिचा सतत छळ करत असल्याने शेवटी तिने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका :तरुणींनो, प्रेमसंबंध निर्माण होत असतांनाही सतर्कता बाळगा, अन्यथा आयुष्याची हानी ओढावून घ्याल ! |
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !