हिंदू संघटित झाल्यास रामराज्य येईलच ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

तीसगाव (अहिल्यानगर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

मार्गदर्शन करतांना कु. प्रतीक्षा कोरगावकर

तीसगाव (जिल्हा अहिल्यानगर), ५ फेब्रुवारी (वार्ता.) – या देशात जिजाऊंचा शिवा पाहिजे, असे जर सर्वांना वाटत असेल, तर घराघरात जिजाऊ पाहिजे आणि प्रत्येक घरात आई जिजाऊ हवी असेल, तर गावागावांत हिंदु राष्ट्र-जागृती सभा होणे आवश्यक आहे. जगातील प्राचीन संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती, प्राचीन धर्म म्हणजे हिंदु धर्म आहे. हा हिंदु धर्म टिकवायचा असेल, तर प्रत्येकाने संघटित होणे आवश्यक आहे. यासाठी आपण जात, पक्ष, संप्रदाय, संघटना बाजूला ठेवून संघटित झालो, तर रामराज्य यायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या अहिल्यानगर येथील समन्वयक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. त्या अशोकमंगल कार्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. या सभेचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या सभेला पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते. समितीचे श्री. रामेश्वर भुकन म्हणाले, ‘‘प्रत्येकाने हिंदु धर्मानुसार आचरण केले पाहिजे.’’

क्षणचित्रे

१. समितीची यशोगाथा सांगतांना प्रत्येक यशावर उपस्थित जिज्ञासू घोषणा देऊन आणि टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते.

२. सभा संपल्यावर ५० हून अधिक धर्मप्रेमी वक्त्यांशी चर्चा करण्यासाठी थांबले होते.

संपादकीय भूमिका

स्त्रियांनो, स्त्री-पुरुष समानतेचा हेका धरण्यापेक्षा स्वत:च कर्तृत्ववान होऊन स्त्रीत्व सिद्ध करा !