दसरा चौकात सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक !

कोल्हापूर – शहरात लक्षतीर्थ वसाहतीमधील अवैध मदरसा प्रकरणावरून दिवसभर तणावाचे वातावरण चालू असतांना दसरा चौकातून शालेय सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास कह्यात घेतले आहे. या संदर्भात काही प्रत्यक्षदर्शींनी पत्रकारांना सांगितले, ‘‘हे विद्यार्थी दसरा चौकातून जात असतांना ते ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. या वेळी अचानक बसवर दगडफेक झाली. यामुळे बसमधील विद्यार्थी घाबरले होते.’’ या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.