नागरिकांना दिसते तेही न दिसणारे आंधळे पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून कारागृहात टाका !

मुंबई उच्च न्यायालय

‘उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी भागात सध्या अवैध बांधकामे सतत होत आहेत. अवैधरित्या उभारण्यात आलेली हॉटेल्स आणि आस्थापने यांच्या विस्ताराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेऊन ही अवैध बांधकामे पाडण्याचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार समुद्रकिनारा नियंत्रण विभाग (सी.आर्.झेड.) आणि पर्यटन खाते यांनी वागातोर समुद्रकिनार्‍यावरील अवैध बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने पाडली. या अवैध बांधकामांपैकी रोमिओ लेन रेस्टॉरंटच्या मालकाने पर्यटन विभागाच्या मालकीच्या भूमीवर कायमस्वरूपी बांधकाम केले होते आणि तिथे अवैधपणे व्यवसाय केला जात होता. याविषयीची याचिका एका स्थानिकाने उच्च न्यायालयात गेल्या वर्षी प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावर न्यायालयाने हे रेस्टॉरंट पाडण्याचा आदेश डिसेंबर २०२३ मध्ये दिला होता.’