सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद !

पडेल येथील श्री भावकादेवी मंदिरात उपस्थित रामभक्त आणि सनातन संस्थेचे साधक

सिंधुदुर्ग – अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले होते. या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७ ठिकाणी हे अभियान राबवण्यात आले. या अभियानाच्या अंतर्गत श्रीरामाचा जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, रामरक्षास्तोत्र पठण करण्यात आले, तसेच उपस्थितांना श्रीरामाची वैशिष्ट्ये  सांगण्यात आली. जिल्ह्यात ३ मंदिरांमध्ये मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. जिल्ह्यातील विविध मंदिरे, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, सनातन संस्थेचे हितचिंतक, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार यांच्या घरी हे अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात समाजातील धर्मप्रेमींसह अबालवृद्धांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रभु श्रीरामतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावा, यासाठी श्रीरामाची माहिती देणारे लघुग्रंथ, सनातन-निर्मित श्रीरामाची नामपट्टी आणि श्रीरामाचे चित्र यांचे वितरण करण्यात आले.

नामजप केल्यावर अनेक भाविकांनी ‘आनंद मिळाला’, ‘प्रभु श्रीरामाचे चैतन्य अनुभवता आले’, असे सांगितले. श्रीराममंदिराच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला (श्रीरामाचे बालक रूप) विशेषांका’चेही मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले.