
पुणे – येथील सुतारदरा भागात २६ जानेवारीला १६-१७ जणांच्या ख्रिस्ती मिशनर्यांच्या समूहाने ‘येशू सर्वांचे भले करतो, हिंदूचे देव पाण्यात टाकले की बुडून जातात, जो स्वतः बुडतो तो इतर भक्तांना काय वाचवणार ?’, अशी विधाने करत परिसरातील गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. (हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी सरकार धर्मांतरबंदी कायदा केव्हा करणार ? – संपादक) याविषयी माहिती मिळताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी हा धर्मांतराचा डाव उधळला आणि ३ कुटुंबांना धर्मांतरित होण्यापासून वाचवले. ‘स्वारद फाउंडेशन’च्या संस्थापिका स्वातीताई मोहोळ, रवींद्र पडवळ, ऋतुजा माने, महेश खोपकर, किसन काळोखे, रवींद्र शेळके, ‘ओम साई मित्र मंडळा’तील युवक आणि दत्तनगर परिसरातील स्थानिक महिला अन् युवक यांनी धर्मांतर करायला आलेल्या मिशनर्यांना पकडले आणि त्यांना शास्त्रीनगर पोलीस चौकी येथे कारवाईसाठी पोलिसांच्या कह्यात दिले.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक