पाक सरकारची संवेदनशील माहिती वैयक्तिक कारणासाठी वापरल्याने शिक्षा
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या निवडणुकांसाठी अवघे ९ दिवस शेष असतांना पाकिस्तानी न्यायालयाने एका प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि खान यांचे सहकारी शाह महमूद कुरेशी यांनाही ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
त्या दोघांनी पाकिस्तानची संवेदनशील आणि गोपनीय माहिती वैयक्तिक उपयोगासाठी वापरल्याचा त्यांच्यावर आरोप होता. यावरूनच त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्या वेळी खान यांनी आरोप केला होता की, यामागे अमेरिकेचा हात आहे. आता निवडणुका तोंडावर असल्याने खान यांच्या विरोधात झालेल्या कारवाईमुळे पाकिस्तानी राजकारण ढवळून निघत आहे.