नागपूर – ‘उद्योग व्यवसाय तुलनेने अल्प असणार्या विदर्भ-मराठवाडा भागात उद्योग-व्यवसाय चालू करणार्या समुहांना सवलतीच्या शुल्कात वीजपुरवठा करणारा ‘पॅटर्न’ (पद्धत) महाराष्ट्रात लवकरच राबवला जाईल’, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या प्रांगणात ‘खासदार औद्योगिक महोत्सव’ अर्थात् ‘ॲडव्हान्टेज विदर्भ’ या ३ दिवसांच्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आहे. विदर्भातील मोठ्या उद्योगांचे प्रदर्शन, तसेच उद्योजकांचे संमेलन यानिमित्ताने आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.