मुंबई – फुटलेल्या ‘इंडि आघाडी’चे तुकडे झाले आहेत. बंगालमध्ये ममता बॅनर्जी वेगळ्या लढणार आहेत, तर पंजाबमध्ये आप, पंगतीत समवेत जेवणारे, जागा वाटपाच्या आणि मोदी यांना हरवण्याच्या गप्पा मारणारे, आज एकमेकांच्या समोर उभे आहेत. बंगालमध्ये राहुल गांधी यांच्या यात्रेला अनुमती देण्यात आली नाही. लोकांमध्ये जाण्यापूर्वीच विश्वास तोडणारे देश जिंकण्याच्या गप्पा मारत आहेत, अशी टीका भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’वर केली आहे. बिहारच्या राष्ट्रीय जनता दलासमवेच्या युती सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या त्यागपत्रावरून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी हे विधान केले आहे.
फुटलेल्या INDI आघाडीचे तुकडे तर झाले आहेत…
बंगालमध्ये ममता बॅनर्जी वेगळ्या लढणार आहेत, तर पंजाबमध्ये आप…
पंगतीत सोबत जेवणारे, जागा वाटपाच्या आणि मोदीजींना हरवण्याच्या गप्पा मारणारे, आज एकमेकांच्या समोर उभे आहेत…
बंगालमध्ये राहुल गांधींच्या यात्रेला परवानगी नाही दिली……
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 28, 2024