Shivananda ShivayogiRajendraSwamiji Predictions : यावर्षी एक प्रमुख संत आणि २ पंतप्रधान यांचा अपमृत्यू होणार !

कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांचे भाकीत !

कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र महास्वामीजी

गदग (कर्नाटक) – राजकीय पालट, तसेच सामाजिक घटना यांविषयी भविष्य व्यक्त करतांना देशाचे लक्ष वेधून घेणारे कोडीमठाचे डॉ. शिवानंद शिवयोगी राजेंद्र स्वामीजी यांनी ‘यावर्षी एक प्रमुख संत आणि २ पंतप्रधान यांचा अपमृत्यू घडेल’, असे भाकीत केले आहे. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांचे अपमृत्यू होतील, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. स्वामीजी म्हणाले की, देवाला शरण गेले पाहिजे. अशा घटना घडणे (श्रीराममंदिराचे उद्घाटन होणे) हे चांगले संकेत आहेत.