गुन्हा नोंद
नागोठणे (जिल्हा रायगड) – येथील १७ वर्षांच्या इब्राहीम युसूफ शिर्लाेस्कर या तरुणाने बाबरी ढाच्याचे छायाचित्र आणि त्याखाली ‘हमारा वक्त आयेगा तो सीर देहसे अलग किए जाएंगे ।’ (‘आमची वेळ येईल तेव्हा शीर धडावेगळे केले जातील.’) असे वाक्य असणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर प्रसारित केली. येथील आंगरआळी येथे रहाणारा हिंदु तरुण श्री. चेतन कामथे याने याविषयी पोलीस ठाण्यात याविषयी माहिती दिली.
या घटनेनंतर पोलीस ठाण्याबाहेर अनेक हिंदु तरुण गोळा झाले. त्यांनी मोठ्या प्रमाणात ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी इब्राहिम शिर्लाेस्कर याला कह्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे लिखित आश्वासन दिले. दुसर्या दिवशी त्याच्या विरोधात श्री. निलेश भोपी यांनी रितसर तक्रार प्रविष्ट केल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
या घटनेच्या दिवशी पोलिसांनी हिंदु तरुणांना घोषणा न देण्याविषयी आणि तेथून निघून जाण्याविषयी सांगितले. नंतर हे तरुण ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिरात एकत्र जमले आणि पुढे काय धोरण ठरवायचे याविषयी चर्चा केली.
२४ जानेवारी या दिवशी पोलिसांनी शांतता समितीची बैठक बोलावून हिंदु आणि मुसलमान समाजातील लोकांना शांततेचे आवाहन करून अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित न करण्याचे, तसेच समाजात तेढ निर्माण होणारी कृत्ये न करण्याचे आवाहन केले.
संपादकीय भूमिकासंबंधित धर्मांध तरुणाला हे सर्व करण्यास प्रवृत्त करणारे कोण आहे, त्याच्या मुळापर्यंत जाऊन पोलिसांनी कारवाई केली पाहिजे ! |