नाट्यगृहाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची पुणे महापालिका आयुक्तांची ग्वाही !

पुणे – सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कला मंदिराचे काम चालू आहे. ते काम येत्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले. नाट्यगृहाचे काम निधीअभावी रखडल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव तापकीर आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रकल्पाची पहाणी केली. सिंहगड रस्ता परिसरातील नाट्य आणि कलाप्रेमी यांसाठी जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचे काम चालू केले होते. यासाठी आतापर्यंत १९ कोटी २५ लाख रुपये खर्च झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. या नाट्यगृहात ७५० प्रेक्षकांना बसण्याची आसन व्यवस्था आणि भव्य कलादालन, तसेच आर्ट गॅलरी करण्यात येणार आहे. पुणे शहरातील पहिलेच भारतीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय ही येथे करण्यात येणार आहे.