गडचिरोली – पुण्यात पोलिसांना शरण आलेला नक्षलवादी संतोष शेलार उपाख्य पेंटर २ वर्षांपूर्वी चकमकीत ठार झालेला नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक होता. १४ वर्षांपूर्वी मिलिंद तेलतुंबडे आणि त्याची पत्नी अँजला सोनटक्के यांच्या प्रभावाखाली येऊन संतोष नक्षलवादी चळवळी सहभागी झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याने आत्मसमर्पण केले. सध्या उपचार चालू असून महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.
७ नोव्हेंबर २०१० या दिवशी पुण्यातील कासेवाडी परिसरातून संतोष शेलार (वय ३३ वर्षे) बेपत्ता झाला होता. नक्षलवादी चळवळीला शहरी भागात पोचवू पहाणार्या तेलतुंबडे दांपत्याने मुंबई, पुणे परिसरातील अनेक तरुणांना नक्षल चळवळीत ओढले होते. त्यात संतोषचा सहभाग होता. तो गेल्या १४ वर्षांपासून तो गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर सक्रीय होता.