ठाणे येथे १० वीतील मुलावर चाकूने आक्रमण केल्याप्रकरणी ३ जण कह्यात !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, २१ जानेवारी (वार्ता.) – येथील वर्तकनगर भागात १० वीमध्ये शिकणार्‍या एका मुलावर चाकूने आक्रमण केल्याचा प्रकार १८ जानेवारीला घडला होता. तो मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असून परीक्षेहून येतांना हा प्रकार घडला. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना कह्यात घेतले आहे. त्यांपैकी एकजण अल्पवयीन आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका :

अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !