सिंहगडाच्या (पुणे) घाट रस्त्यावर वाहतूककोंडी !

दिवसभरामध्ये सव्वा लाख रुपयांचा पथकर जमा

पुणे – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलीदानाने पावन झालेला ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक ठेवा जतन होण्यापेक्षा तो पर्यटन क्षेत्र म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने येतांना दिसतात. यामुळे १४ जानेवारी या सुटीच्या दिवशी पर्यटकांनी या ठिकाणी सकाळीच गर्दी केली होती. त्यामुळे गडावरील वाहनतळ पूर्णपणे भरून गेले होते. गडाच्या घाट रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन त्याचा त्रास प्रवाशांना होत होता. पर्यटकांमुळे वनविभागाला १ लाख २७ सहस्र रुपयांचा पथकर गोळा झाला. सिंहगड घाट रस्त्यावर जेव्हा वाहतूककोंडी निर्माण झाली, तेव्हा सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक, सुरक्षा रक्षक यांनी धावपळ करत टप्प्याटप्प्याने वाहने सोडणे चालू केले. त्यामुळे काही प्रमाणामध्ये वाहतूक सुरळीत झाली.