‘इंडिगो’चे विमान १३ घंटे उशिरा उड्डाण करत असल्याने प्रवाशाने वैमानिकाला मारला ठोसा !

नवी देहली – उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने धुक्याचा परिणाम वाढला आहे. याचा सर्व प्रकारच्या वाहतुकींवर परिणाम होत आहे. अनेक विमानांची उड्डाणे विलंबाने होत आहेत. देहली ते गोवा या मार्गावरील इंडिगो विमानाने १४ जानेवारी तब्बल १३ घंटे उशिराने उड्डाण केले. १३ घंट्यांच्या विलंबाविषयी माहिती देत असतांना वैमानिकावर एका प्रवाशाने आक्रमण करत ठोसा मारला. साहिल कत्रिया असे या प्रवाशाचे नाव आहे. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या घटनेनंतर  इंडिगो प्रशासन संबंधित प्रवाशाविरोधात कारवाई करणार आहे. दुसरीकडे इंडिगो विमानाविरोधातील तक्रारीतही वाढ झाली आहे.