हिंगोली येथे तरुणाकडून आई-वडील आणि भाऊ यांची हत्या !

‘दृश्यम्’ चित्रपट आणि ‘क्राईम पेट्रोल’ मालिका पाहून कट रचला !

हिंगोली – येथील डिग्रस वाणी गावातील तरुणाने आई-वडील आणि भाऊ यांची हत्या करून दुचाकीमुळे अपघात झाल्याचा बनाव रचला. ‘दृश्यम्’ चित्रपट ५ वेळा, तर ‘क्राईम पॅट्रोल’ ही हिंदी मालिका वारंवार पाहून या सर्वांच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले. तिघांची हत्या करून गावालगत असलेल्या रस्त्याजवळ या सर्वांचे मृतदेह ठेवत अपघात झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा वरील प्रकार उघड झाला.

कुंडलिक जाधव, कलावती जाधव आणि मुलगा आकाश जाधव अशी मृतांची नावे होती. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधव याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आई-वडील आणि भाऊ पैसे देत नसल्याच्या रागातून महेंद्र याने हे कृत्य केले. तिघांनाही झोपेच्या गोळ्या देऊन डोक्यामध्ये रॉडने वार करत त्यांची हत्या केली. आरोपी महेंद्र जाधव मागील २-३ मासांपासून घरीच होता. कोणतेही काम करत नव्हता.

संपादकीय भूमिका 

लोकांच्या मनावर विपरीत परिणाम घडवणारे चित्रपट किंवा मालिका प्रसारित करण्यापेक्षा त्यांच्यावर योग्य संस्कार होतील अशीच दृश्ये यांतून दाखवली गेली पाहिजेत ! चित्रपट दिग्दर्शक किंवा मालिका निर्माते यांनी हे लक्षात घ्यावे !