पुणे येथून भाजपकडून ‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’स प्रारंभ

मंदिराची स्वच्छता करून अभियानास प्रारंभ करताना चंद्रशेखर बावनकुळे

पुणे – भारतीय जनता पक्षाच्या वतीने १४ जानेवारी या दिवसांपासून ‘हर मंदिर स्वच्छता अभियाना’स प्रारंभ करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘रोकडोबा मंदिर’ आणि ‘श्रीराम मंदिरा’ची स्वच्छता करून अभियानास प्रारंभ केला.

भाजपचे नेते आणि ‘हिंदु इकेसिस्टम’चे संस्थापक कपिल मिश्रा यांनी  ‘भारतातील मंदिरांची स्वच्छता’ करण्याची शपथ घेतली आहे. संस्थेशी निगडित बांधव जिथे रहातात त्या ठिकाणी प्रत्येक मासाच्या पहिल्या रविवारी आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांसह जवळच्या मंदिरामध्ये जाऊन स्वच्छता करतील आणि मंदिराची देखभाल करतील, असा ठराव केला होता. केवळ ६ दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनानंतर ४०० हून अधिक मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे.