श्री कात्रादेवी वाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील श्री. सुभाष सखाराम राणे यांना सेवेसाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे !

श्री सुभाष राणे

१. गायत्री परिवाराकडून श्री कात्रादेवी वाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे २४ कुंडी यज्ञाचे आयोजन केले जाणे

‘१३ ते १७.३.२०२३ या कालावधीत तुमच्या गावात ‘गायत्री’ परिवाराच्या वतीने २४ कुंडी यज्ञ होणार आहे’, असे गायत्री परिवाराने मला ३ मासांपूर्वीच कळवले होते. यज्ञाच्या काही दिवस आधी मी गावात यज्ञाचा प्रचार केला आणि नंतर गायत्री परिवाराच्या साधकांच्या समवेत काही ठिकाणी यज्ञविधीच्या निमंत्रणपत्रिकाही वाटल्या.

२. ‘देवद (पनवेल) आश्रमात एका सेवेसाठी येऊ शकता का ?’, असे विचारल्यावर ‘गावातहोणार्‍या यज्ञापेक्षा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सेवा करणे, हाच मोठा यज्ञ आहे’, असे वाटणे

मी गायत्री परिवाराकडून होणार्‍या यज्ञाचा गावात प्रचार करत असतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातून श्री. विवेक नाफडे यांनी मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘देवद आश्रमात ग्रंथांशी संबंधित सेवा उपलब्ध आहेत. या सेवेसाठी तुम्ही येऊ शकता का ?’’ तेव्हा थोडा वेळ माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला; पण नंतर माझ्या मनात विचार आला, ‘गावात होणार्‍या यज्ञापेक्षा गुरुसेवेचा यज्ञ माझ्यासाठी निश्‍चितच अधिक मोठा आणि महत्त्वाचा आहे. गावातील यज्ञापेक्षा याच यज्ञात सहभागी होऊया !’ १२.३.२०२३ या दिवशी मी देवद आश्रमात सेवेसाठी गेलो.

३. देवद आश्रमात आल्यावर झालेले लाभ !

अ. मला अनेक जन्मांची साधना असलेल्या साधकांचा सत्संग लाभला.

आ. मला साधनेसाठी पूरक मार्गदर्शन आणि गुरुचरणांपर्यंत नेणारी सेवा मिळाली.

इ. सेवा-साधना करतांना मला आश्रमातील प्रसाद-महाप्रसाद यांचा लाभ झाला.

ई. मला देवद आश्रमातील अनेक संतरत्नांचे दर्शन झाले.

उ. देवद आश्रमात आल्यावर मला ‘इथेही दोन दिवस यज्ञविधी होणार आहेत’, असे  कळले. ते ऐकून माझे मन सुखावले. १६.३.२०२३ या दिवशी ‘दशदिक्पाल पूजन’ आणि १७.३.२०२३ या दिवशी ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग झाला. त्यांचा मला लाभ घेता आला.

ऊ. यज्ञाच्या वेळी मला प्रत्यक्ष लक्ष्मीची देहधारी रूपे असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या मातांचे दर्शन झाले.

४. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. मला प्रथमच ‘सनातनच्या आश्रमातील युवा पुरोहित मंत्रोच्चार कसे करतात ?’, ‘यज्ञात कुठल्या आहुती दिल्या जातात ?’, ‘यज्ञकुंडाची रचना कशी असते ?’ इत्यादी गोष्टी शिकायल्या मिळाल्या.

आ. ‘दशदिक्पाल पूजना’च्या वेळी पावसाच्या रूपाने वरुणदेवतेचे आगमन झाल्यामुळे थोडी धावपळ उडाली; मात्र त्या प्रसंगातून ‘साधकांनी पावसापासून यज्ञस्थळ वाचवण्यासाठी तळमळीने कसे प्रयत्न केले ?’, ते मला शिकता आले.

५. कृतज्ञता

गुरुदेवांच्या कृपेनेच माझ्याकडून देवद आश्रमात येण्याचा निर्णय घेतला गेला. ‘त्यांच्याच कृपेने मला त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभही झाला’, यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. सुभाष सखाराम राणे, मु. पो. श्री कात्रादेवी वाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी (१९.३.२०२३)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक