मराठवाड्यात अजून २ दिवस पाऊस !

१३ जानेवारी नंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेत वाढलेली थंडी, ईशान्येकडील आर्द्रतायुक्त वारे आणि दक्षिणेकडून वहाणार्‍या वार्‍यांच्या संयोगातून महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी २ दिवस पावसाचा अंदाज आहे. १३ जानेवारीनंतर थंडीत वाढ होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवली आहे. मराठवाडा, कान्हादेश, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ९ आणि १० जानेवारी या दिवशी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागात तुरळक पाऊसही पडला. सायंकाळनंतर वारे वहात असल्याने गारवा जाणवत होता.

हिवाळ्यात हृदयरुग्णांत ५० टक्क्यांची वाढ !

हिवाळ्यात शरिराची चयापचय क्रिया वेगाने होते. त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाण हिवाळ्यात ५० टक्क्यांनी वाढते. या काळात आहार-विहाराची विशेष काळजी घ्यावी.

– आधुनिक वैद्य मिलिंद खर्चे, हृदयरोगतज्ञ (कार्डिओलॉजिस्ट)