परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या मंगलमय रथोत्सवाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सौ. माधवी घाटे

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा मंगलमय रथोत्सव बघण्यासाठी मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात गेले होते. तेथे मी आणि अन्य काही साधक आगाशीत बसलो होतो.

२. त्या वेळी माझे लक्ष सहजच आकाशाकडे गेले. तेव्हा मला आकाशातील ढग रथ, सारथी आणि घोडे यांच्या आकारात दिसले. हे मी माझ्याजवळ बसलेल्या साधिकेलाही सांगितले. त्याच्यानंतर गरुडाच्या आकारातच ढग दिसले.

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे रथातून येणार आहेत’, हे मला नंतर समजले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.

४. रथात विराजमान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून माझी सतत भावजागृती होत होती. त्या वेळी माझी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. माधवी घाटे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक