आपत्काळाविषयी संतांनी केलेले भाष्य !

१. प.पू. काणे महाराज (नारायणगाव)

प.पू. काणे महाराज

‘वर्ष १९९२ मध्ये एकदा मी  प.पू. काणे महाराज यांना विचारले, ‘‘तिसरे महायुद्ध होणार आहे  का ?’’ त्यावर त्यांनी केलेले भाष्य येथे दिले आहे.

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

अ. ‘तिसरे नाही, शेवटचेच महायुद्ध होणार आहे.

आ. मुंबई क्रिकेटचे मैदान होईल. (म्हणजे क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे भूमी सपाट होईल, इमारती, गाड्या इत्यादी काही असणार नाही, म्हणजेच पूर्ण मुंबई नष्ट होईल.)

इ. आपत्काळात वीज नसेल.

ई. देशाची एवढी हानी होईल की, ‘राष्ट्र उभारणीसाठी संपूर्ण एका पिढीला आपले जीवन द्यावे लागेल.’

२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

काही वर्षांपूर्वी प.पू. डॉ. आठवले माझ्याशी बोलतांना म्हणाले, ‘‘जसे ‘टायटॅनिक’ जहाज अकस्मात् बुडले, तसा आपत्काळ अकस्मात् येईल.’’

– डॉ. पांडुरंग मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.१०.२०२३)