देहलीतील बनावट नोटा बनवणारी टोळी अटकेत
नवी देहली : देहली पोलिसांनी बनावट चलनी नोटा बनवणार्या ३ जणांच्या एका टोळीला नुकतीच अटक केली आहे. या ३ जणांनी गेल्या ५ वर्षांत ५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा बाजारात वापरल्या. बनावट नोटा छापण्यासाठी या तिघांनी यंत्रणा निर्माण केली होती. यात लॅपटॉप, प्रिंटर, शाई, तसेच कागदाचा समावेश होता. त्यांच्याकडून ५० लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. आसिफ अली, दानिश अली आणि सरताज खान अशी या तिघांची नावे आहेत. (अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) ते तिघेही उत्तरप्रदेशातल्या बदायू येथील रहिवासी आहेत. यातील दानिश हा युनानी वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे. सरताजला कॉम्प्युटरविषयी सखोल माहिती आहे. तो बदायूतल्या त्याच्या गावात कॉम्प्युटर सेंटर चालवतो. या नोटांची तो देशातल्या विविध भागात विक्री करत होता.
(सौजन्य : Republic Bharat)
संपादकीय भूमिका
५ वर्षे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? अल्पसंख्य असणारे मुसलमान गुन्हेगारी क्षेत्रात बहुसंख्य असतात, हे लक्षात घ्या ! |