Israel Hamas War : हमासला पुन्हा हवा आहे युद्धविराम !

तेल अविव – हमासला एक महिन्याचा युद्धविराम हवा आहे, असा दावा  दावा ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ या वृत्तपत्राने कतारमधील ‘अल् अरबी अल् जदीद’ या संकेतस्थळावरील वृत्ताचा संदर्भ देत केला. या युद्धविरामाच्या बदल्यात इस्रायली ओलिसांची सुटका करण्याची सिद्धताही हमासने केल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इस्रायली रणगाड्यांनी गाझामधील सेंट्रल पार्क परिसरातील कारवाई तीव्र केली आहे. इस्रायला मात्र युद्धविराम अमान्य असल्याचे सांगितले जात आहे.