विरार येथे २ गटांत लोखंडी रॉडच्या साहाय्याने हाणामारी : १ जण घायाळ

विरार – येथील मोहक सिटीसमोर २६ डिसेंबरच्या रात्री ११.३० वाजता दोन गटांत वाद झाला, तसेच लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉड यांच्या साहाय्याने हाणामारी झाली. या मारहाणीत १ जण घायाळ झाला आहे. या मारहाणीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य स्वरूपात लाठीमार करावा लागला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असूने विरारला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सौजन्य एबीपी माझा 

संपादकीय भूमिका 

गुंडांना पोलिसांचे जराही भय नसल्याचे द्योतक ! हे पोलिसांना लज्जास्पद !