अवैध ‘डान्सबार’वर पोलीस आणि प्रशासन यांनी आधीच बंदी का घातली नाही ? अशांवरही कारवाई करा !

(प्रतिकात्मक चित्र)

‘पर्यटकांची लूट करणार्‍या, तसेच वेश्याव्यवसायाला थारा देणार्‍या ‘डान्सबार’ना टाळे ठोकले जाणार’, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी, म्हणजे २२ डिसेंबर २०२३ या दिवशी कळंगुट येथील ११ ‘डान्सबार’ना प्रशासनाने टाळे ठोकले. टाळे ठोकण्यात आलेल्या ‘डान्सबार’नी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुज्ञप्ती घेतली नव्हती. कळंगुट परिसरात एकूण १३ पैकी ११ ‘डान्सबार’ अवैधपणे चालू होते. कारवाई केलेल्यांमध्ये ‘डेवील्स क्लब’, ‘नॉर्मस् पब’, ‘ब्लॅक हार्ट’, ‘शील्ड लेव्हल’, ‘थ्री किंग्स’, ‘मेहफील’, ‘३९ स्टेप्स’, ‘पोश नॉश’, ‘ट्रॉपिकल २४+७’, ‘कोड्डा’ आदींना टाळे ठोकण्यात आले.’ (२४.१२.२०२३)