राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील माहिती
नागपूर – देशभरात लहान मुलांवरील अत्याचारांच्या विरोधात १ लाख ६२ सहस्र गुन्हे नोंदवले गेले आहेत. यांत ८.७ टक्के वाढ झाली असून देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. दुसर्या स्थानावर मध्यप्रदेश आहे, अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात २० सहस्र ७६२ गुन्हे नोंद आहेत. दुसर्या स्थानावरील मध्यप्रदेशात २० सहस्र ४१५, उत्तरप्रदेशात १८ सहस्र ६८२, राजस्थानमध्ये ९ सहस्र ३७० आणि ओडिशात ८ सहस्र २४० गुन्हे नोंदवले गेले आहेत.
१. महाराष्ट्रात बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलीची हत्या केल्याच्या १४ घटना घडल्या आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये उत्तरप्रदेश पहिल्या स्थानावर असून ३७ अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
२. १८ वर्षांखालील मुला-मुलींवर प्राणघातक आक्रमण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यांमध्ये देशात महाराष्ट्र दुसर्या स्थानावर आहे.
३. राज्यात मुलांवर अत्याचार होण्याच्या सर्वाधिक घटना मुंबईत घडल्या आहेत. मुंबईत ३ सहस्र १७४ गुन्हे नोंद असून अशा गुन्ह्यांमध्ये नागपूर दुसर्या स्थानावर आहे. नागपूर येथे ७६५ गुन्हे नोंद आहेत. तिसर्या स्थानावर पुणे असून तेथे ७३२ गुन्हे नोंद आहेत.
संपादकीय भूमिकालहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार होण्यात महाराष्ट्र सर्वांत पुढे असणे हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी सरकारी यंत्रणा काय प्रयत्न करणार ?, हे जनतेला कळले पाहिजे ! |