वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालावर ३ जानेवारीला सुनावणी करणार, असे वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाने हा अहवाल उघडण्यासाठी २१ डिसेंबर ही दिनांक आधी निश्चित केली होती; मात्र २२ डिसेंबरला ‘बार कौन्सिल’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवक्त्यांनी २१ डिसेंबरला काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हे लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश ए .के. विश्वेश यांनी सुनावणीसाठी ३ जानेवारीची दिनांक निश्चित केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ए.एस्.आय.) विभागाने १८ डिसेंबर या दिवशी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा बंद अहवाल सादर केला होता.