भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टच्या प्रदेश संयोजक पदी उत्तम कुमार यांची नियुक्ती !

श्री. उत्तम कुमार

वसई (पालघर) – भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टच्या प्रदेश संयोजकपदी वसई येथील उत्तम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हि नियुक्ती करण्यात आली. भाजपा महाराष्टप्रदेश कार्यालयात हा सोहळा पार पडला. या वेळी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे उपस्थित होते. महाराष्ट्रभरातील केरळी समाजापर्यंत भाजपच्या विविध योजना पोचणे आणि पक्षाची राज्यभरात संघटनात्मक नियुक्ती करण्याचे दायित्व त्यांच्याकडे असेल.

लहानपणापासून संघाशी निगडित असलेले उत्तम कुमार हे वसई परिसरात भाजपचे कार्य करत आहेत. यापूर्वी त्यांनी बूथ प्रमुख, वसई रोड मंडळ सचिव, मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा महासचिव अशा विविध पदांचे दायित्व पेलले आहे. हिंदुसंघटनासाठी ते वर्षभर कार्यरत असतात. ते या वेळी म्हणाले, ‘‘पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार’’.