नागठाणे (सातारा) येथील शासकीय गोदाम फोडले ! 

सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) – नागठाणे येथील शासकीय गोदाम फोडून गहू आणि तांदुळ यांची पोती चोरण्‍यात आली आहेत. नागठाणे येथील गुन्‍हेगारांनी गावातीलच शासकीय गोदाम फोडून गहू आणि तांदळाची पोती घरात लपवल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्‍या आधारे पथकाची निर्मिती करून अभिलेखावरील जानवर शौकत भोसले यांना कह्यात घेऊन चौकशी करण्‍यात आली. तेव्‍हा भोसले यांच्‍या घरातून गहू आणि तांदुळ यांची पोती हस्‍तगत करण्‍यात आली. भोसले यांच्‍याकडे अधिक चौकशी केली असता, त्‍यांनी त्‍यांच्‍या ४ साथीदारांची नावे सांगितली. त्‍यांनाही कह्यात घेण्‍यात आले असून संबंधितांवर बोरगाव पोलीस ठाण्‍यात चोरीचा गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. (यातून गावातील शासकीय गोदामेही सुरक्षित नाही, हे लक्षात येते. शासकीय गोदामे फोडून पोती पळवेपर्यंत सुरक्षा कर्मचार्‍यांना लक्षात कसे आले नाही ? – संपादक)