निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केल्याप्रकरणी राईस मिल चालकांना दंड !

नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – निकृष्ट दर्जाचा तांदूळ जमा केल्याप्रकरणी संबंधित राईस (तांदूळ) मिल चालकांना २ कोटी ६ लाख ७० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. आमदार सुभाष धोटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.