असुरक्षित शहाड !
ठाणे, १४ डिसेंबर (वार्ता.) – कल्याणजवळील शहाड भागात रात्रीच्या वेळेत अंबरनाथ येथील एका विद्यार्थ्याचे ४ जणांनी अपहरण करून त्याला म्हारळ येथील टेकडी भागात नेले होते. तेथे त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील १६ सहस्र रुपये लुटले. त्यानंतर पीडित विद्यार्थी नीरज यादव याने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली होती. या प्रकरणात पोलिसांनी विनायक मदने आणि बबलू जडे यांना अटक केली आहे, तर त्यांच्या २ साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.