मुंबई – नवाब मलिक यांचा जामीन सर्वाेच्च न्यायालयाने रहित करावा. आजारपणाच्या कारणास्तव घेतलेला जामीन रहित करण्यात यावा. ‘कचरा सेठ’ची प्रकृती एकदम ‘फर्स्ट क्लास’ (उत्तम) दिसत आहे. नागपुरात विधीमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित रहायला नवाब मलिक यांना जामीन मिळालेला नाही. मिया मलिकला तात्काळ आर्थर रोड कारागृहामध्ये पाठवावे, असे भाजप नेते मोहित कंबोज यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.